प्रियकराच्या मौजेसाठी "त्या' बनल्या चोर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - कांदिवली स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. टिंकल जयराज सोनी, टिनल जयंतीलाल परमार अशी त्यांची नावे आहेत. प्रियकरावर पैसे उडवण्यासाठी त्या चोरी करत असल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून तीन लाख किमतीचे 28 मोबाईल आणि 20 मेमरी कार्ड जप्त केले आहेत. चोरीचे फोन विकत घेणाऱ्या चंपक ऊर्फ राहुल तगाजी राजपुरोहित यालाही अटक झाली आहे. 

तीन महिन्यांपासून कांदिवली स्थानकात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार रेल्वे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी याप्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त (पश्‍चिम) पुरुषोत्तम कराड, सहायक आयुक्त विनय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. महिला सहायक उपनिरीक्षक मांजरेकर, पोलिस नाईक पृथ्वी नाईक, महिला पोलिस नाईक स्वप्ना शिंदे यांनी कांदिवली रेल्वे स्थानकात सापळा लावून टिंकलला पोलिसांनी चोरी करताना पकडले. चौकशीत तिने मैत्रीण टिनल हिच्यासह प्रियकराच्या मौजेसाठी चोरी करत असल्याचे सांगितले. दोघींचा एकच प्रियकर असून फेसबुकवरून त्याच्याशी ओळख झाल्याचे सांगितले. प्रियकरामार्फत त्या हे मोबाईल चंपकला विकत असल्याचे तिने सांगितले. चंपककडून 14 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्यापैकी सात मोबाईल चोरीचे आहेत. त्याबाबत बोरिवली रेल्वे पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. चंपक आणि टिनल हिला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी प्रियकराचा पोलिस शोध घेत आहेत. 

राहणीमानामुळे संशय नाही! 
टिंकल आणि टिनल या दहिसर परिसरात राहतात. सांताक्रूझ येथील एका महाविद्यालयात त्या शिकतात. दोघी महाविद्यालयासाठी घराबाहेर पडत असत. बोरिवलीहून लोकल पकडल्यानंतर कांदिवलीत त्या दोघी चोऱ्या करायच्या. टिंकल मोबाईल चोरायची; तर टिनल चोरलेले मोबाईल बॅगेत लपवत असे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी पहिली चोरी केली होती. त्यानंतर त्या सातत्याने चोऱ्या करू लागल्या. दोघींचे राहणीमान पाहता कुणावरही संशय येत नव्हता. 

Web Title: girl friend Thieves for the lover