पेइंग गेस्ट तरुणींचे छुप्या कॅमेरातून चित्रीकरण

पेइंग गेस्ट तरुणींचे छुप्या कॅमेरातून चित्रीकरण

मुंबई - ऍडॅप्टरमध्ये बसवलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे पेइंग गेस्ट तरुणींचे चित्रीकरण केल्याचा प्रकार गिरगाव परिसरात उघड झाला. याप्रकरणी डी. बी. पोलिसांनी घरमालकाच्या मुलाला अटक केली आहे.

तक्रारदार तीन तरुणी या वैद्यकीय विद्यार्थिनी आहेत. त्या पेइंग गेस्ट म्हणून गिरगावमधील एका घरात जूनपासून राहत होत्या. त्यांच्या बोलण्याची माहिती घरमालकाला मिळत होती. तो वारंवार येऊन त्यांना ओरडत होता. आठवडाभरापूर्वी त्यांनी घरात पडदा बांधला. घरमालकाच्या मुलाने त्यांना पडदा काढण्यास सांगितले. पडद्यामुळे ऍडॅप्टरला सिग्नल मिळत नसल्याने टीव्ही चालत नसल्याचा बहाणा त्याने केला. त्या वेळी या तरुणींनी संबंधित ऍडॅप्टरबाबत गुगलवरून माहिती शोधली. हा ऍडॅप्टर म्हणजे छुपा कॅमेरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

ऍडॅप्टरमधील छुप्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण त्याच्या मोबाईलमध्ये दिसत असल्याचे चौकशीदरम्यान पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला. या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com