नेरूळमध्ये मुलीचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नवी मुंबई - एका तरुणाने 12 वर्षीय विद्यार्थिनीची दिशाभूल करून तिला एका इमारतीच्या टेरेसवर नेत अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. 

नेरूळ सेक्‍टर 10 मध्ये राहणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी गुरुवारी (ता. 12) सकाळी 11.15 वाजता शाळेतून घरी जात होती. 

त्यावेळी एका 25 ते 30 वयोगटातील अज्ञाताने मुलीला तिच्या वडिलांची कागदपत्रे त्याच्याकडे असल्याचे सांगून तिला एका ठिकाणी येण्यास सांगितले. आरोपीने तिच्या वडिलांचे नावही अचूक सांगितल्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवत तिने येण्यास होकार दिला. त्याने तिला सारसोळे डेपोसमोरील आनंदी बिल्डिंगच्या गच्चीवर नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रसंगावधान दाखवत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तरुणाने तेथून पलायन केले. मुलीने घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर नेरूळ पोलिसांत तक्रार दाखल केली. नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

Web Title: Girl molestation in Nerul

टॅग्स