मित्रांसह पित्याचा मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

कांदिवली येथील १६ वर्षांच्या मुलीवर पित्यासह त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एका वकिलाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

मुंबई - कांदिवली येथील १६ वर्षांच्या मुलीवर पित्यासह त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एका वकिलाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सर्व संशयितांवर पॉस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी वकिलाने तक्रार अर्जात केली आहे.

१९ जुलैला पीडित मुलीचे वडील आणि त्याचे मित्र घरातील वरच्या मजल्यावर दारू पित बसले होते. त्या वेळी वडिलांनी मुलीला बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला. यापूर्वीही तिच्यासोबत अश्‍लील चाळे करण्यात आले होते. कोणाला काही सांगितल्यास चित्रफीत व्हायरल करू, अशी धमकीही पीडित मुलीला देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl raped by his friends with Father in mumbai