तरुणीवर बलात्कार करून विकले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पीडितेला मोबाईल दिला अन्‌ सुटका झाली
तरुणी मुंबईत नवखी असल्याने तिला कोणीच मदत करत नव्हते. अखेर कुंटणखान्यातच वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेने पीडित तरुणीला मोबाईल आणून दिला. त्यावरून पीडित तरुणीने पश्‍चिम बंगाल येथील आईला दूरध्वनी करून तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. तिच्या कुटुंबाने तातडीने मुंबईकडे धाव घेतली. स्वयंसेवीच्या माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकून पीडित तरुणीची सुटका केली. याप्रकरणी शेख व रेणुका यांना अटक केली. याप्रकरणी पंकज मंडल व त्याच्या मित्राचा पोलिस शोध घेत आहेत.

मुंबई - पश्‍चिम बंगालमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिला १२ हजार रुपयांत कुंटणखान्यात विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला दूरध्वनी केल्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पीडित तरुणी पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये पश्‍चिम बंगाल येथील गावी असताना आजारी होती. यामुळे ती नेहमीच परिसरातील एका औषधांच्या दुकानातून औषध विकत घ्यायची, त्या वेळी तिची ओळख तेथे काम करणाऱ्या पंकज मंडल नामक व्यक्तीशी झाली. पंकजचे तिच्या घरी येणे-जाणे होत असल्याने त्याच्याबद्दल तरुणीला विश्‍वास निर्माण झाला. १६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडित तरुणी पंकजसोबत हावडा ब्रिज येथे फिरायला गेली असताना तिला गुंगीचे औषध दिले. तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये होती. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो असून मुंबईला पोचून गावी परत जाऊ, असे आश्‍वासन पंकजने तरुणीला दिले. त्यानंतर आरोपीने तिला मानखुर्द येथील एका घरात नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.

त्यानंतर पंकजच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पंकजने तिला राजू ऊर्फ अजीज शेख (वय ४५) याच्या स्वाधीन केले. पंकजने १२ हजार रुपयांना विकल्याचे शेखने तरुणीला सांगितले. शेखने तिला कामाठीपुऱ्यातील एका कुंटणखाना चालवणाऱ्या जंपन रेणुका (वय ४१) हिच्या स्वाधीन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl sale after rape crime