आईने मोबाईल न दिल्याने नववीतील मुलीची आत्महत्या

Suicide
Suicide

नवी मुंबई - आईने मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोपरखैरणेत घडली.

संबंधित मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती. काही महिन्यांपूर्वी तिला आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला होता. नाताळच्या सुट्ट्या संपल्यानंतर तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावे म्हणून तिच्याकडून मोबाईल काढून घेण्यात आला होता. त्यामुळे ती नाराज होती. गुरुवारी दुपारी ती शाळेतून घरी आल्यानंतर तिने आईकडे मोबाईल मागितला; मात्र तिने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने आईच्या ओढणीने घरातील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी तपासाला सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com