तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते 'ही' चोरी महेशने केलीये की नाही ? कमेंट करा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

मुंबई : ओशिवारा येथे राहणाया प्रेयसीच्या घरातील पैशावरच प्रियाकराने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदर प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले. 

मुंबई : ओशिवारा येथे राहणाया प्रेयसीच्या घरातील पैशावरच प्रियाकराने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदर प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले. 

गुन्हा दाखल झालेल्या प्रियाकराचे नाव महेश इदनानी असे आहे. 25 वर्षांची तक्रारदार तरुणी अंधेरीतील लोखंडवाला परिसरात तिच्या बहिणीसोबत राहते. ती सध्या एका ऑर्केस्ट्रामध्ये गायक म्हणून कामाला आहे. नोव्हेंबर 2017 साली तिची ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या महेशशी ओळख झाली होती. त्याचा चॉकलेट एक्‍सपोर्टचा व्यावसाय आहे. ओळखीतून त्यांच्यात प्रेम झाले आणि तेव्हापासून ते लिव्हइन  रिलेशनशीपमध्ये अंधेरीतील विरा देसाई रोड, धनंजया अपार्टमेंटमध्ये राहत होते.

#COVID19 - कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

सुरुवातीला महेशने तो अविवाहीत असल्याचे सांगितले होते, मात्रा गेल्या वर्षीच तिला तो विवाहीत असल्याचे समजले होते, त्यानंतर त्यांच्यात नेहमी खटके उडू लागले. त्यातून तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून दुसाया ठिकाणी राहण्याचा निर्णया घेतला. 8 मार्च 2020 रोजी तिने महेशसमोरच तिचे दागिने आणि अकरा लाख रुपयांची कॅश कपाटातील तिजोरीत सुरक्षित लॉक करुन ठेवली होती. 

मात्र 12 मार्चला तिने तिजोरी उघडण्याचा प्रयात्न केला, तिजोरी उघडत नव्हती. त्यामुळे तिने गोदरेज कंपनीला फोन करुन कंपनीच्या कर्मचायाला घरी बोलाविले होते. यावेळी या कर्मचायाने तिजोरीमध्यो कोणीतरी छेडछाड केल्याचे सांगितले, तसेच तिजोरीचे लॉक बदलले गेल्याचे सांगितले. त्यानंतर या कंपनीच्या माणसाने तिला लॉक उघडून दिले. यावेळी तिजोरीतील अकरा लाख रुपयांची कॅश आणि दोन लाख रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे तिच्या निदर्शनास आले.

#COVID19  कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

ही चोरी महेश यानेच केल्याची खात्री होताच तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात महेश इदनानीविरुद्धा तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर महेशविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. लवकरच महेशची पोलिसांकडून चौकशी होणार आहे, ही चोरी त्याने केल्याचे उघडकीस आल्यास त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.  

girlfriend accused boyfriend for the theft of 11 lacs cash and jewelery worth 2 lacs


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girlfriend accused boyfriend for the theft of 11 lacs cash and jewelery worth 2 lacs