लोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी

दिनेश गोगी
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.

उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.

कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना सुरडकर हिला नर्सिंगचा कोर्स लावला होता. त्यासाठी संजना ही नाहूरला जात होती. आज सकाळी नेहमी प्रमाणे संजना 11 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर रेल्वे स्थानकातून नाहूरला जाण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात चढली.  मात्र दारातच अधिक गर्दी असल्याने संजनाचा तोल गेला आणि ती उल्हासनगर स्थानकाच्या काही अंतरावर दारातून डोक्यावर पडली.त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरडकर परिवार हा सर्वपरिचित असल्याने आणि संजनाचा लोकल मधून पडून मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी 7 वाजता संजनावर शोकमग्न वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी आजी माजी नगरसेवक,समाजसेवक,समाजसेविका,संजनाचे वर्ग मित्र, मैत्रिणी, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

Web Title: girls died due to mob at railway door