पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पाली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एकाने आपल्याच चार वर्षीय मुलीची जंगलात नेऊन धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. आरोपीने मुलीची हत्या करून मृतदेह चक्‍क खांद्यावर त्याच्या मावशीच्या घरात ठेवला होता. यामुळे दहिगावमध्ये खळबळ उडाली आहे. सुधागड तालुक्‍यातील दहिगाव येथील राम जाधव याने हे कृत्य केल्याचा आरोप असून, त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

राम जाधवचे लग्न होउन 15 वर्षे झाली आहेत. त्याला एकूण सहा मुले आहेत. त्यातील शालू ही मुलगी सर्वांत लहान होती. राम याला पहिल्यापासून दारूचे व्यसन होते. तो अनेक वेळा आपल्या पत्नीला मारहाण करत असे. त्याने अनेक वेळा तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाणही केली असल्याचा आरोप राम याच्या मेहुण्याने केला आहे. चारित्र्यावर संशय असल्यानेच त्याने आपल्या बहिणीच्या मुलीची हत्या केल्याचे मेव्हण्याने तक्रारीत म्हटले आहे. 

राम जाधव याला पाली पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व पोलिसांनी शनिवारी प्रथम सत्र न्यायालय रोहा येथे हजर केले. न्यायालयाने राम याला 26 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आली आहे. 

Web Title: The girls murder doubt of the character of the wife