सरकारी नोकरी द्या, अन्यथा विष तरी द्या... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे. 

दिव्यांग सेनेच्या वतीने गुरुवारी सकाळी 11.30 वाजता चर्नी रोड स्थानकापासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढण्यात येईल, असे अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी सांगितले. महाराष्ट्रात कर्णबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग व्यक्तींची संख्या मोठी आहे. शेकडो अपंग बेरोजगार आहेत. त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, यासाठी एकाही आमदार-खासदाराने प्रयत्न केलेले नाहीत, असे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. 

बेरोजगार अपंगांना भत्ता द्या, बस आगारांमध्ये चहा, शीतपेये आणि वर्तमानपत्रांचे स्टॉल द्या, महापालिका शाळांमध्ये दिव्यांग कौशल्य विकास केंद्र सुरू करा, मेट्रोमध्ये नोकरी द्या, आदी मागण्या प्रलंबित आहेत, असे संघटनेचे मुंबई अध्यक्ष रश्‍मी कदम यांनी सांगितले.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give government jobs otherwise give poison