लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या : अजित पवार

लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या : अजित पवार

मुंबई : शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार यांच्याशी कधीच कॉम्प्रमाईज नसतं... शिस्त मोडेल किंवा अस्वच्छता कोण करेल किंवा कुठे दिसली की दादांचा दट्ट्या पडलाच म्हणून समजा...असाच दट्टया लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांवर आज सभागृहात पडला. अजित पवार यांनी अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. 
विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा आज अजित पवारांनी उपस्थित केला शिवाय आपला संतापही व्यक्त केला. 

विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित करताना 12-14 तास अधिकारी, कर्मचारी काम करत असतात त्यांच्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे सापडत असतील तर हा त्यांच्या भावनेचा, श्रध्देचा अपमान आहे. महाबळेश्वर, लोणावळा याठिकाणी संबंधित खात्याने धाडी टाकल्या आहेत. कालच एक लक्षवेधी झाली, त्यामध्ये रसवंतीगृहात 80 टक्के बर्फ हा दूषित पाण्यापासून तयार केला जात आहे. ही गंभीर बाब आहे. बेजबाबदारपणा आहे, असेही अजित पवार म्हणाले.

आज लोकांना कळेना कुठल्या हॉटेलमध्ये जावून खावे, खावे तर काय खावे... आरोग्याला आज धोका निर्माण झाला आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. त्याशिवाय हे शहाणे सरळ होणार नाही त्यामुळे सरकार यावर काय करणार असा सवालही अजित पवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com