"फर्जंद'ला प्राईम टाईम न दिल्यास आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - "फर्जंद' चित्रपटाला मुंबईत "प्राईम शो' न मिळाल्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली आहे. "फर्जंद'ला प्राईम शो न मिळाल्यास मनसे स्टाईलने खळ्ळखट्याकला सामोरे जाण्यास तयार राहा, असा इशारा खोपकर यांनी चित्रपटगृहांच्या मालकांना दिला आहे. 

"वीरे दी वेडिंग', "परमाणु', "भावेश जोशी' या हिंदी चित्रपटांना अधिकाधिक प्राईम शो मिळाल्याने "फर्जंद'ला नकारघंटा ऐकावी लागली. संपूर्ण राज्यातील 2-3 दिवसांच्या प्रतिसादानंतर या चित्रपटाचे शो वाढवण्यात आले होते. मात्र, फक्त मुंबईतच शो वाढवले नाहीत. त्यातच केवळ दुपारीच चित्रपट दाखवण्यात आला. याबाबत चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, की आम्ही अनेक चित्रपटगृह मालकांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही ऐकायला तयार होईना. आम्ही नेहमी वितरकांच्या संपर्कात होतो आणि त्यांना शो वाढवण्यासह प्राईम टाईम शो देण्याची विनंती करीत होतो. वितरक आणि चित्रपटगृह मालकांच्या या वागणुकीमुळे "फर्जंद'चे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच आम्ही खोपकर यांच्याकडे धाव घेतली. "फर्जंद'ला प्राईम टाईम मिळावा, यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. 

Web Title: Give prime time to Farzand movie