मुंबई लोकलच्या महिला डब्ब्यावर पुन्हा 'बाटली-फेक'

मुंबई लोकलच्या महिला डब्ब्यावर पुन्हा 'बाटली-फेक'

मुंबई : आपल्या सुमार दर्जाच्या कामगिरीमुळे आधीच प्रवाशांच्या नजरेतून उतरलेल्या मध्य रेल्वेच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना सोसावा लागलाय. मुंब्र्यात भरधाव लोकलवर एका अज्ञात व्यक्तीनं दारूची बाटली फेकल्याचा प्रकार घडला आहे. 

कसारा स्थानकातून दुपारी १.२२ च्या सुमारास सीएसएमटी ट्रेन निघाली. ही लोकल दुपारी 2 च्या सुमारास कळवा मुंब्रा स्थानकांदरम्यान असताना मुंब्रा खाडी जवळील पुलावरून एका व्यक्तीनं लोकलच्या दिशेनं दारूची बाटली भिरकावली.

सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र ही बाटली पहिल्या फर्स्टक्लासच्या महिला डब्यावर आदळल्यानं मोठा आवाज झाला. या आवाजामुळे महिला डब्यात एकच गोंधळ उडाला. बाटली दरवाजाच्या खांबाला लागल्यानं त्याच्या काचा जनरल डब्यात उडाल्या.

दरम्यान, एका प्रवाशाने हेल्पलाईनवरून या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेची रेल्वे पोलिसांनी पुष्टी केली आहे. 

रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल चोरी, पाकिटमारी, महिलांची छेडछाड, लोकलवर दगड भिरकावणं असे प्रकार वारंवार घडत असतात. मात्र, तरीदेखील रेल्वे प्रशासनाकडून या बाबी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. आधीच रेल्वेचा लेटलतिफ कारभार त्यात तोंड दाबुन बुक्यांचा मार अशीच काहीशी अवस्था मध्य रेल्वेच्या प्रवाशांची झाली आहे. 

WebTitle : glass liquor bottel thrown on ladies first class of mumbai local

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com