"पेटा' बनली बसंतीची पालक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई - रेल्वेने लिलाव केलेली बसंती बकरी अखेर "पेटा' (पिपल फॉर एथिलक ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल)ने ताब्यात घेतली आहे. त्यासाठी तिच्या खरेदीदाराला पाच हजार रुपये मोजण्यात आले आहेत. ही बकरी पेटा पाळणार आहे. 

मुंबई - रेल्वेने लिलाव केलेली बसंती बकरी अखेर "पेटा' (पिपल फॉर एथिलक ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल)ने ताब्यात घेतली आहे. त्यासाठी तिच्या खरेदीदाराला पाच हजार रुपये मोजण्यात आले आहेत. ही बकरी पेटा पाळणार आहे. 

विनातिकीट पकडलेल्या या बकरीचा रेल्वेने लिलाव केल्याबद्दल न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पेटाने दिला होता. त्यानंतर रेल्वेने खरेदीदाराला शोधून बकरीला परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तीन दिवस बकरीवर उपचारही करण्यात आले. या बकरीला पुन्हा मालक घेऊन गेल्याने केंद्रीय मंत्री आणि पशुप्रेमी मनेका गांधी यांनी रुग्णालयात फोन करून "बकरीला का सोडले?' असा जाब विचारला. त्यामुळे रेल्वेसह रुग्णालय प्रशासनाचेही धाबे दणाणले होते. आता "पेटा'ने बकरीच्या खरेदीचे अडीच हजार, उपचार आणि वैद्यकीय चाचण्यासाठी अडीच हजार रुपये असा खर्च मालकाला दिला आहे. 

Web Title: goat rail is expensive