अनुराधा पौडवाल यांच्या घरातून देवीचे दागिने चोरीला

अनुराधा पौडवाल यांच्या घरातून देवीचे दागिने चोरीला

मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या घरातील देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी खार पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम ३८० (नोकराने केलेली चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पौडवाल यांचे स्वीय सहायक निशांत परमार यांनी खार पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी पुजारी विमलेंदु विभुती मिश्रा (४६) याला अटक केली आहे. तो विलेपार्ले येथील रहिवासी असून पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

पौडवाल यांच्या खार पश्‍चिम येथील धैर्य रेसिडेन्सी येथील राहत्या फ्लॅटमधील देवी काली मातेची सोनसाखळी, दोन बांगड्या व पायातील दोन जोडवी असे सात लाखांचे दागिने नाहीसे झाले होते. घरातील इतर नोकर व पुजारी मिश्रा यांना याबाबत विचारले असता त्यांनी त्याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यातील मिश्रा याचे वागणे संशयास्पद वाटल्याने परमार यांनी मिश्राच्याविरोधात तक्रार केली.

web title : Goddess jewelry was stolen from Anuradha Poudwal's house

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com