
Mumbai News : अंधेरीच्या गोखले पूलाचे दोन महाकाय गर्डर हाटवले
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले पूलाचे दोन गर्डर पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्री हाटवले आहे. तर उर्वरित दोन गर्डर फेब्रुवारी अखेरीस मेगाब्लॉक घेऊन हटवण्यात येणार आहेत. गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता.
त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले; मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, ७ नोव्हेंबर २०२२ पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे. आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात येत आहेत.
गोखले पूलाचे दोन महाकाय गर्डर पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्री हटवले आहेत. रेल्वेच्या हाद्दीतील पूलाचे गर्डर हाटवण्यासाठी मध्यारात्री पाच तासांचा पॉवर ब्लॉक घेतला होता. रेल्वे ट्रॅकच्या बाहेर क्रेन उभा करून सदरचे गर्डर हाटवणे मोठे आव्हानाचे काम होते. मात्र रेल्वेने दोन गर्डर सुरक्षित हाटवण्याची मोहिम फत्ते केली आहे. तर उर्वरित दोन गर्डर फेब्रुवारी अखेरीस हटवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहेत.