विमानतळावर सोने, परदेशी चलन जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर तीन दिवसांत केलेल्या कारवाईत 63 लाखांचे सोने तसेच 22 लाखांचे परदेशी चलन जप्त केले आहे.

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर तीन दिवसांत केलेल्या कारवाईत 63 लाखांचे सोने तसेच 22 लाखांचे परदेशी चलन जप्त केले आहे.

नासीर हुसेन मोहंमद हाशिम खान हा रविवारी (ता.5) दुबईहून सहार विमानतळावर आला होता. त्याच्या हालचाली "एआययू'च्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. तो विमानतळावरील शौचालयातून बाहेर आल्यावर त्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. शौचालयातील कचऱ्याच्या डब्यातून जप्त केलेल्या पाकिटात 20 गोल्ड बार आढळून आले. त्यांची किंमत 63 लाख रुपये इतकी आहे. दुसरी कारवाई शुक्रवारी (ता.3) झाली. नौशाद कंदाथिल हा दुबईला जाणार होता. त्याच्या बॅगेची "एआययू'च्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. बॅगेत 33 हजार डॉलर होते. त्या डॉलरचे भारतातील मूल्य 22 लाख 29 हजार 150 रुपये आहे. नौशादविरोधात "फेमा' कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: gold foreign currency seized on airport