गॅस शेगडीतून सोने तस्करी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

मुंबई - सोने तस्करीसाठी गॅस शेगडीचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) कारवाई करून त्या शेगडीत लपवलेले 13 लाख दोन हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तीन दिवसांत एआययूने कारवाई करून 95 लाख 13 हजारांचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी दोन परदेशी महिलांनाही अटक केली आहे.

गुरुवारी (ता. 19) मोहम्मद दानिश हा रियाधहून सहार विमानतळावर आला. त्याने सोबत शेगडी आणली होती. त्याच्यावर एआययूच्या अधिकाऱ्यांना संशय आला. शेगडीची तपासणी केली असता, त्यात आठ सोन्याच्या लगडी सापडल्या. त्यांची किंमत 13 लाख दोन हजार रुपये इतकी आहे.

Web Title: gold smuggling in gas grate crime