साडेपाच कोटींचे सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) न्हावा शेवा परिसरात केलेल्या कारवाईत 19 किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत पाच कोटी 54 लाख रुपये असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) न्हावा शेवा परिसरात केलेल्या कारवाईत 19 किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत पाच कोटी 54 लाख रुपये असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. जप्त केलेले सोने भंगारात लपवून आणण्यात आले होते.

डीआरआयच्या पथकाने पाच कंटेनरची तपासणी करून सोन्याच्या 163 लगडी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी शौर्य एक्‍झिम या कंपनीचा मालक राजेश भानुशाली याला अटक करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतून हे सोने भारतात आणण्यात आले होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Gold worth Rs.5 crores seized

टॅग्स