esakal | दिवेआगरमध्ये पुन्हा सुवर्ण गणेशाचा डौल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दिवेआगरमध्ये पुन्हा सुवर्ण गणेशाचा डौल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला. याबरोबरच दरोड्यासारखी घटना पुन्हा घडू नये आणि पर्यटकांची संख्या या निमित्ताने रायगडमध्ये पुन्हा मोठ्या संख्येने वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनही तितक्याच उपाययोजना करीत आहे.सकारात्मक यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा मुद्दा आहे.

कोकणभूमीच्या सुवर्णयुगाची ओळख असलेल्या दिवेआगर येथील गणेश मंदिरावर २४ मार्च २०१२ रोजी दरोडा पडला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज असलेल्या मंदिरातील दरोड्याची उकल करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. यामुळेच आता अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन दिवेआगर आणि जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळावर कठोर उपाययोजना राबवित आहे. यामध्ये महत्त्वाच्या नाक्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे, बायोमॅट्रीक प्रणाली, ओळख पटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे दिवेआगर येथील यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श ठरेल यासाठी जिल्हा प्रशासन आराखडा तयार करीत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केल्या आहेत.

हेही वाचा: सानपाडा येथील बालरोगतज्ज्ञाची आत्महत्या

दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर रायगडकरांची खरी परीक्षा सुरू होणार आहे. देशभरातील पर्यटकांना जिल्ह्यात आकर्षित करावे लागणार आहे. पर्यटन वाढीसाठी भौतिक सुधारणांबरोबर नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवावे लागतील.

-अदिती तटकरे, पालकमंत्री - रायगड

loading image
go to top