PMC बॅंक खातेधाराकांसाठी 'ही' आहे खुशखबर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मालमत्तांच्या लिलावासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून मूल्यांकन सुरू.. 

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडकडील (एचडीआयएल) मालमत्तांचे मूल्यांकन सुरू केले आहे. या प्रक्रियेनंतर पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेकडे तारण असलेल्या या मालमत्तांचा लिलाव करून खातेदारांच्या ठेवी परत करणे शक्‍य होईल. त्यामुळे खातेदारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी पीएमसी बॅंकेकडील एचडीआयएलच्या तारण मालमत्तांचे मूल्यांकन दोन दिवसांपूर्वी सुरू केले. लिलावासाठी सर्व मालमत्तांचे मूल्यांकन होईपर्यंत वाट पाहिली जाणार नाही. मूल्यांकन झालेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाला केली आहे.

का झाली मनसेच्या संदीप देशपांडे यांना अटक ?

पोलिसांनी टाच आणलेल्या एचडीआयएलच्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी "ना हरकत' प्रमाणपत्र देण्याची विनंती प्रशासकाने बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेला पत्राद्वारे केली. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 4000 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे.

३० वर्षांत मुंबईसह कोकणाला जलसमाधी

या मालमत्तांच्या लिलावाला परवानगी देण्याबाबतचा अर्ज एक-दोन दिवसांत न्यायालयात केला जाईल. न्यायालयाने मंजुरी दिल्यावर या मालमत्तांच्या लिलाव करणे शक्‍य होईल, असे सांगण्यात आले. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने फौजदारी प्रक्रिया संहितेतील (सीआरपीसी) कलमांखाली एचडीआयएलचे मालक राकेश व सारंग वाधवा यांच्या स्थावर व इतर मालमत्तांच्या लिलावासंदर्भात अर्ज केला होता. त्यापैकी एक नौका, दोन विमाने आणि 14 वाहने या मालमत्ता पीएमसी बॅंकेकडे तारण नव्हत्या. परंतु, वाधवा यांनी या मालमत्ता विकण्याची परवानगी आधीच दिली होती.

फडणवीस घेणार 5 नोव्हेंबरला वानखेडेवर मुख्यमंत्रीपदाची शपथ?

त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखा लवकरात लवकर या मालमत्तांचा लिलाव करून पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. 

WebTitle : good news for all PMC bank account holders


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news for all PMC bank account holders