कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 'ही' मोठी गुड न्यूज...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

देशात सध्या चौथा आठवडा सुरु झालाय, मात्र अद्याप आपण कोरोनाच्या दुसऱ्याच स्टेज मध्ये आहोत.

मुंबई - देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत अशात. देशात सर्वाधिक COVID19 पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज २३ मार्च सकाळी आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आलेलं आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईच्या लोकल ट्रेन्स देखील बंद करण्यात आल्या आहेत. गरज नसल्यास घरातून बाहेर पडू नका, घरात राहून कोरोनाशी आपण लढू शकतो असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. तरीही महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. 

मोठी बातमी उद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये ?

दरम्यान, अशातही महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत एक चांगली बातमी दिली. सध्या चर्चा आहे ती कोरोनाच्या विविध स्टेजेसची. अशात जगभरातील आकडेवारी पाहता चौथा आठवडा आणि पाचव्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग हा स्टेज ३ म्हणजेच कम्युनिटीमध्ये किंवा समूहात फैलाव झालेला आपल्याला पाहायला मिळालं आहे.. आपली आकडेवारी पाहता इथे देशात सध्या चौथा आठवडा सुरु झालाय, मात्र अद्याप आपण कोरोनाच्या दुसऱ्याच स्टेज मध्ये आहोत. अजूनही महाराष्ट्रात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही.   

सावधान ! हँड सॅनिटायझर वापरून लगेच जेवण बनवाल तर होत्याचं नव्हतं होईल..

महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अनेक रुग्ण हे परदेशात कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्रात पॉझिटिव्ह डिटेक्ट झालेत. इतरांना झालेली लागण ही त्यांच्या डायरेक्ट संपर्कात आल्याने झालीये. यामध्ये घरातील सदस्य किंवा ड्रायव्हर्स यांचा संसर्ग आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना अजूनही स्टेज दोनमध्येच असल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. 

good news by health minister rajesh tope about pandemic corona spread and its stage


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news by health minister rajesh tope about pandemic corona spread and its stage