रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी! मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरील फेऱ्यांची संख्या 2773

रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी! मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरील फेऱ्यांची संख्या 2773

मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, सोमवार पासून 753 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्यात. त्यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्यांची संख्या 2773 झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावर 1572 तर पश्चिम रेल्वे मार्गावर 1201 फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्य सरकारने नुकतेच सरसकट लोकल प्रवाशांना प्रवासाची नियोजित वेळेत परवानगी देण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाला दिला होता. त्यावरून रेल्वेने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवरून फक्त 22 लाख कर्मचाऱ्यांचा रेल्वे सेवा देऊ शकते असे उत्तर दिले होते. तर त्यापेक्षा अतिरिक्त प्रवाशांना सुविधा द्यायची असल्यास राज्य सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी असेही म्हटले होते.

त्यामुळे राज्य सरकारने गर्दीच्या नियोजनाच्या उपाययोजना सुचवल्यास सरसकट लोकल प्रवासाची परवानगी रेल्वेला द्यावी लागणार आहे. त्यामुळे रेल्वेने पूर्वनियोजनाच्या दृष्टीने रेल्वेचे फेऱ्यांमध्ये वाढ करणे सुरू केले आहे. यामध्ये सध्या मध्य रेल्वे मार्गावर 1020  फेऱ्या धावत असून, त्यामध्ये 552 अतिरिक्त फेऱ्यांचा सोमवार पासून समावेश झाला आहे. त्यामुळे एकूण 1572 फेऱ्या धावणार आहे.  त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 1000 फेऱ्यांमध्ये 201 फेऱ्यांची वाढ होऊन एकूण 1201 सेवा धावणार आहे.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Good news local train passengers Number round trips on Central Western Railway 2773

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com