मुंबईत म्युकरमायकोसीसचे फक्त 5 टक्के रुग्ण

95 टक्के रूग्ण मुंबईबाहेरचे, पालिकेकडून हजार इंजेक्शन्सचा पुरवठा
Mucormycosis
MucormycosisFile Photo

मुंबई: कोरोनावर मात केल्यानंतर लोक आता काळी बुरशी म्हणजेच म्यूकोर मायकोसिस या आजाराला बळी पडत आहेत. मात्र, याचे प्रमाण मुंबईत फारच कमी आहे. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या संख्येवरून याचा अंदाज केला जाऊ शकतो. या रूग्णालयात दाखल झालेल्या म्युकरमायकोसीसच्या एकूण रूग्णांपैकी 95 टक्के रुग्ण मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत. यातील बहुतेक रुग्ण नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील आहेत. (Good News Mumbai has only 5 per cent of Mucormycosis Patients)

Mucormycosis
"अरेरे! भाजपचा आधी इतरांवर दबदबा होता अन् आता..."

कोरोनातून बरे झालेले रूग्ण आता काळ्या बुरशीमुळे ग्रस्त आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काळ्या बुरशीचे रुग्ण देखील आढळले होते परंतु त्यांची संख्या फारच कमी होती. पण, आता काळ्या बुरशीचा धोका दुसर्‍या लाटेत वाढला आहे. दररोज, काळ्या बुरशीचे दोन ते तीन संशयित रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. पालिकेच्या नायर, सायन, केईएम आणि कूपरमध्ये या चार मोठ्या रुग्णालयात 150 हून अधिक रुग्ण काळ्या बुरशीचे दाखल आहेत.

'केईएम'चे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, रूग्णालयात म्युकरमायकोसीसचे 60 हून अधिक रुग्ण असून नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील जास्त रूग्ण आहेत. नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, नायरमध्ये म्यूकरमायसिसचे 24 रुग्ण दाखल झाले आहेत.

Mucormycosis
"बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर..."; भाजपचा सवाल

कूपर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे डॉ. विनोद गीते यांनी सांगितले की, कूपरमध्ये म्यूकरमायसिसचे 13 रुग्ण दाखल आहेत. यापैकी 8 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहेत. यातील काही रुग्णांच्या नाकाच्या सायनस भागात शस्त्रक्रिया केली गेली तर, एका रुग्णाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली गेली आहे. कूपर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या म्हणण्यानुसार, दोन रुग्णांच्या मेंदूपर्यंत बुरशी पोहोचली असून त्यांच्यावर न्यूरो विभागातील डॉक्टर उपचार करत आहेत. या 13 रुग्णांपैकी एका रूग्णाची डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, मुंबईतील रूग्णालयात दाखल झालेले 95 टक्के रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील आहेत. भारमल म्हणाले की, रुग्णांपैकी फक्त 5 टक्के रुग्ण मुंबईचे आहेत.

Mucormycosis
P305 बार्ज समुद्रतळाशी सापडला; 20 जण अद्यापही बेपत्ता

1 हजार इंजेक्शन्सचा पुरवठा-

डॉ. रमेश भारमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील मोठ्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या उपचारांत प्रभावी ठरणार्या अ‍ॅम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनच्या एक हजार वायलचा पुरवठा केला गेला आहे. जे सर्व रुग्णालयांमध्ये वितरित केले गेले आहे. जसजसे हे इंजेक्शन इथे पोहोचतील तसतसे ते रुग्णालयांमध्ये वितरीत केले जाईल.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com