मध्य रेल्वेपेक्षा मेट्रो सुसाट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपर अशा मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पश्‍चिम आणि मध्य रेल्वेस्थानकाला थेट जोडणाऱ्या मेट्रोने आतापर्यंत 40 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. वेगवान प्रवास आणि थेट पश्‍चिम-मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सुविधेमुळे मेट्रो मध्य रेल्वेपेक्षा वरचढ ठरली आहे. 

8 जून 2014 रोजी वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपरदरम्यान मेट्रो 1 प्रकल्प सुरू करण्यात आला. अवघ्या एक हजार 423 दिवसांत मेट्रोने 40 कोटी प्रवाशांचा पल्ला गाठला आहे. फक्त 300 दिवसांत 10 कोटी प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. मेट्रोने दररोज प्रति किलोमीटर 23 हजार 425 प्रवासी प्रवास करतात. त्या तुलनेत मध्य रेल्वेमार्गावर प्रति किलोमीटर 22 हजार 500 प्रवासी प्रवास करतात. ताज्या आकडेवारीवरून मेट्रोने प्रवासी संख्येत मध्य रेल्वेला मागे टाकले आहे. लवकरच मेट्रो पश्‍चिम रेल्वेलाही मागे टाकेल, असा अंदाज आहे. पश्‍चिम रेल्वेमार्गावर दररोज प्रति किलोमीटर 29 हजार 250 प्रवासी प्रवास करतात. 

मुंबई उपनगरी मार्ग सुमारे 300 किमीपर्यंत विस्तारला आहे. पश्‍चिम रेल्वेचा उपनगरी मार्ग चर्चगेट ते डहाणूपर्यंत 120 किमी आहे. मध्य रेल्वेचा उपनगरी मार्ग सीएसएमटी ते कल्याण, कल्याण ते कसारा, कल्याण ते खोपोली, सीएसएमटी ते गोरेगाव आणि वडाळा ते पनवेल असा एकूण 180 किमीवर विस्तारला आहे. त्यात वसई-दिवा आणि दिवा-पनवेल उन्नत मार्गाचा समावेश आहे. त्या तुलनेत मुंबई मेट्रो केवळ वर्सोवा ते घाटकोपरपर्यंत 12 किमीपर्यंत विस्तारली आहे. 

रोजची प्रवासी संख्या 
- पश्‍चिम मार्ग - 35 लाख 
- मध्य मार्ग - 40 लाख 
- मेट्रो - 2 लाख 81 हजार 

Web Title: Good response metro than the central railway