राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला मुरबाड मध्ये चांगला प्रतिसाद

मुरलीधर दळवी 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राज्यातील 22 हजार ग्रामसेवक या संपात सहभागी असल्याचे ग्रामसेवक संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले. तर मुरबाड तालुक्यात 29 तलाठी 5 मंडळ अधिकारी यानी नायब तहसिलदार हनुमंत जगताप यांना निवेदन देवुन संपात सहभाग दर्शविला.

मुरबाड (ठाणे) - मुरबाड तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला तहसीलदार, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, वन विभाग कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व विविध मागण्या मान्य करुन घेण्यासाठी हा संप पुकारल्याचे  मुरबाड मधिल संपकरी कर्मचाऱ्यानी सांगितले.

राज्यातील 22 हजार ग्रामसेवक या संपात सहभागी असल्याचे ग्रामसेवक संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले. तर मुरबाड तालुक्यात 29 तलाठी 5 मंडळ अधिकारी यानी नायब तहसिलदार हनुमंत जगताप यांना निवेदन देवुन संपात सहभाग दर्शविला. मात्र आत्पकालिन परिस्थिति साठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले तलाठी संघटनेचे अध्यक्ष युवराज पडवळ, सुर्यकांत पाटील व संदिप चौधरी यांनी निवेदन दिले. मुरबाड पंचायत समिती समोर संपकरी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A good response to state government employees Strike at murbaad