मालवाहतूकदार आजपासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुंबई - सातत्याने होणारी इंधन दरवाढ, टोल आणि थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यातील वाढ या प्रमुख मुद्द्यांवर देशभरातील माल वाहतूकदारांनी शुक्रवार (ता. 20) पासून बेमुदत संप आणि चक्का जामची हाक दिली आहे.

मुंबई - सातत्याने होणारी इंधन दरवाढ, टोल आणि थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यातील वाढ या प्रमुख मुद्द्यांवर देशभरातील माल वाहतूकदारांनी शुक्रवार (ता. 20) पासून बेमुदत संप आणि चक्का जामची हाक दिली आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने (एआयएमटीसी) या संपाची घोषणा केली आहे. देशभरात एकच परमिट असावे यासाठी खासगी प्रवासी वाहतूक संघटनाही यात सहभागी होणार आहे. स्कूल अँड कंपनी बस ओनर असोसिएशन, मराठी कामगार वाहतूक सेना, ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेईकल ओनर्स असोसिएशन आदी संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे.

स्कूल बसचाही लाक्षणिक संप
या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यभरातील स्कूल बस एक दिवस संपावर जाणार आहेत. शाळेच्या बसला टोलमुक्ती, इंधनाचे दर निश्‍चित करावेत. शाळेभोवती पार्किंगसाठी जागा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. राज्यभरातील 42 हजार स्कूल बस संपात सामील होतील. मुंबई शहर आणि उपनगरातील आठ हजार स्कूल बस संपावर जाणार असल्याचे स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

Web Title: Goods Transporters Strike