गुडविन ज्वेलर्सच्या मालकाचे दोन फ्लॅट्‌स सील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

पोलिसांनी मर्सिडीजही केली जप्त

कल्याण : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार असलेल्या गुडविन ज्वेलर्सच्या मालकाची मर्सिडीज कार पोलिसांनी जप्त केली असून पलावा सिटीमध्ये असलेले त्याचे दोन फ्लॅट्‌सदेखील सील केले आहे.

गुडविनप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपशीलानुसार गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आकडा आतापर्यंत सुमारे चार कोटींपर्यंत पोहोचला आहे. दुकानाचे मालक सुनीलकुमार, सुरेशकुमार तसेच व्यवस्थापक मनीष कुंडी यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी मालकांची मर्सिडीज कार जप्त करुन ती रामनगर पोलिस स्थानकात आणली आहे. गुडविनच्या मालकांचे डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये असलेल्या दोन फ्लॅटस्‌ची पोलिसांनी झडती घेतली असून त्यांना पोलिसांनी सील केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goodvin Jweller's two flats seal