'गोप्या' लवकरच रसिकांच्या भेटीला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - लहान मुलांच्या भावविश्‍वावर आधारित "गोप्या' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेश फिल्म्स ऍण्ड एण्टरटेन्मेंटच्या बॅनरअंतर्गत अमोल भालेराव, नितीन पगारे आणि राज पैठणकर यांनी "गोप्या'ची निर्मिती केली आहे. पैठणकर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

व्यसनाच्या आहारी गेलेला पिता आणि घर चालवण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेल्या गोपी नावाच्या मुलाभोवती चित्रपटाची कथा फिरते. आदित्य पैठणकर गोप्याच्या भूमिकेत दिसणार आहे. माधवी जुवेकर, कमलेश सावंत, मनीषा पैठणकर, मानसी मुरूडकर, उदय सबनीस, अजय जाधव, समीर विजयन, राजेश भोसले, प्रकाश धोत्रे, अमीर तडवळकर, निवास मोरे, जयवंत वाडकर यांच्याही भूमिका आहेत. केवळ मुलांच्या मानसिकतेवर चित्रपट काढण्यापेक्षा कलाकार-तंत्रज्ञांची चांगली भट्टी जमल्याने समाजातील ज्वलंत चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिग्दर्शक पैठणकर यांनी सांगितले.

योगेश सबनीस यांनी "गोप्या' चित्रपटाचे संवादलेखन केले आहे. पटकथा योगेश महाजन यांची, तर अनिकेत के. यांनी छायालेखन केले आहे. कथा आणि गीतकारही पैठणकर आहेत. किरण-राज यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. डॉ. नेहा राजपाल, किरण पैठणकर आणि बालगायक रोहित वाघ यांनी यातील गीते गायली आहेत.

Web Title: gopya movie release