मुंबई : मोतीलाल नगर पुनर्विकासाची अखेर निविदा निघाली | Mhada update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHADA

मुंबई : मोतीलाल नगर पुनर्विकासाची अखेर निविदा निघाली

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : गोरेगाव (Goregaon) पश्चिमेकडील मोतीलाल नगर (Motilal nagar) येथील म्हाडा वसाहतींचा (mhada society) विशेष बाब म्हणून पुनर्विकास (redevelopment) करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या (mva Government) बैठकीत मान्यता देण्यात आली. गृहनिर्माण विभागाने याबाबत शासन निर्णय जारी (GR) करताच म्हाडाच्या (mhada) मुंबई मंडळाने पुनर्विकासासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा (tender) मागविल्या आहेत.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 488 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

हा प्रकल्प ७ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य म्हाडाने ठेवले असून कंपन्यांना १३ डिसेंबरपर्यंत निविदा भरता येणार आहे. मोतीलाल नगरच्या तीन वसाहती ५० हेक्टर जागेवर वसल्या आहेत. म्हाडाला हा प्रकल्प राबविणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यानेच एजन्सीची नेमणूक करून प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरिता प्रतिगाळा १६०० चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येणार आहे; तर अनिवासी वापराकरिता प्रतिगाळा ९८७ चौरस फूट इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृहनिर्माण विभागाने तातडीने शासन निर्णय काढला नव्हता. त्यामुळे म्हाडाकडून निविदा काढण्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत होती. अखेर गृहनिर्माण विभागाने शासन निर्णय जारी केल्याने मंडळाने निविदा काढली आहे. निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी निविदा पूर्व बैठक म्हाडामध्ये आयोजित करण्यात आली आहे. १४ डिसेंबर रोजी निविदा खुली करण्यात येणार आहे.

५० कोटींची गॅरंटी द्यावी लागणार!

निविदा सूचनेनुसार नियुक्त कंत्राटदाराला मोतीलाल नगर १ ते ३ मधील घरे, झोपडपट्टी, विकास आराखड्यानुसारची आरक्षणे, म्हाडाचा हिस्सा, अशी विविध कामे ८४ महिन्यांत पूर्ण करायची आहेत. निवड होणाऱ्या कंपनीला ५० कोटी रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे.

loading image
go to top