होय, आम्हाला शौचालयात जाण्याची भीती वाटते!

girl
girl

मुंबई : घरापासून शौचालयापर्यंत जाण्याची वाट अवघ्या काही मिनिटांची; पण तीही आमच्यासाठी जीवघेणी आहे. टपोरींकडून होणारी अश्‍लील शेरेबाजी आणि छेडछाड सहन करत प्रसाधनगृहाबाहेर तासन्‌ तास उभे राहावे लागते... ही व्यथा आहे गोवंडी येथील बैंगनवाडी परिसरातील 90 टक्के महिलांची. 

"कोरो' सामाजिक संस्थेने युनिसेफसह पहिल्यांदाच महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील सध्यस्थितीचा अहवाल तयार केला. बुधवारी एम-पूर्व प्रभाग कार्यालयात प्राथमिक अहवाल मांडण्यात आला. अनेक विकृत नजरा चुकवत घरापासून स्वच्छतागृहापर्यंत जावे लागते. तिथे गर्दी असल्याने तासन्‌ तास खाली मान घालून उभे राहावे लागते, अशी खंत अंजुम शेख यांनी व्यक्त केली. आमच्या नैसर्गिक अधिकारावर बाधा येत असून त्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही, अशी कैफियत अंजुम यांच्यासह आयेश शेख या मुलीने मांडली. सुरक्षिततेसह लहान मुलींसाठीही प्रसाधनगृहे नसल्याने होणारी गैरसोय मांडत प्रसाधनगृहांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता तक्रार पेटी ठेवा, अशी विनंतीही तिने केली. 

पालिकेचे विविध विभाग आणि म्हाडाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमध्ये शौचालये बांधली जातात; मात्र म्हाडाने बांधलेल्या शौचालयांची अवस्था बिकट आहे, असा दावा पालिकेच्या निवृत्त अधिकारी सीमा रेडकर यांनी केला. 

एम-ई वॉर्डातील वस्तीतील प्रसाधनगृहांची सद्यःस्थिती 
- एकूण प्रसाधनगृहे ः 449 
- बंद किंवा बांधकाम सुरू असलेली प्रसाधनगृहे ः 59 
- प्रत्यक्षात वापरली जाणारी प्रसाधनगृहे ः 390 

प्रसाधनगृहे बांधणारी संस्था- प्रसाधनगृहांची संख्या- प्रसाधनगृहे सांभाळणाऱ्यांची अनुपलब्धता- विजेची अनुपलब्धता- पाण्याची अनुपलब्धता- बांधकामाची स्थिती 
म्हाडा - 194 - 54 टक्के - 44 टक्के - 85 टक्के - 37 टक्के ठीक; तर 36 टक्के खराब 
पालिका - 100 - 57 टक्के - 58 टक्के - 86 टक्के - 27 टक्के ठीक; तर 40 टक्के खराब 
पैसे देऊन वापरा - 51 - 2 टक्के - 0 टक्के - 0 टक्के - 41 टक्के ठीक; तर 12 टक्के पूर्ण खराब 
एमएसडीपी - 22 - 0 टक्के - 2 टक्के - 5 टक्के - 40 टक्के - 2 टक्के 

स्वच्छता आणि सुरक्षेसाठी दक्षता समिती 
शौचालयाच्या परिसराची स्वच्छता आणि सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात येणार आहे. समितीचे समन्वय कोरे संस्था करील, असे सुप्रिया सोनार यांनी सांगितले. जनजागृतीही करण्यात येणार असून त्याला पालिकेच्या प्रभाग कार्यालयामार्फतही सहकार्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com