'बेस्ट'ला मिळाला मदतीचा हात; मंजूर झाली 'एवढी' रक्कम..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

मुंबई  : महापालिका महासभेने बेस्ट उपक्रमाला 400 कोटी रुपयांची मदत देण्याच्या प्रस्तावाला आज (सोमवार ता. 9) मंजुरी दिलीये. महापालिकेकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1700 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

मुंबई  : महापालिका महासभेने बेस्ट उपक्रमाला 400 कोटी रुपयांची मदत देण्याच्या प्रस्तावाला आज (सोमवार ता. 9) मंजुरी दिलीये. महापालिकेकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1700 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

बेस्ट उपक्रमावर अडीच हजार कोटींचे कर्ज असल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड झाले होते. अशा परिस्थितीत महापालिकेने बेस्टला चार वर्षांपासून आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. महापालिकेने बेस्टला या वर्षी 2100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील 1700 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले असून, 400 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सप्टेंबरमध्ये मंजुरी दिली होती.

आणखी वाचा :  अरुण गवळींना दिसली रेल्वे ट्रॅकवर बॉडी आणि त्यांनी ट्रेन तत्काळ थांबवली..
 

 

  • 2014-15 - 150 कोटी 
  • 2015-16 - कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी 25 कोटी 
  • 2016-17 - बसेस खरेदीसाठी 100 कोटी तर सानुग्रह अनुदानासाठी 21.64 कोटी 
  • 2017-18 - 13.69 कोटी 
  • 2018-19 - 14.56 कोटी 
  • 2019-20 - 139.20 दिव्यांगांना मोफत तिकीट अनुदान,एलईडी पथदिवे बसवण्यासाठी साठी तसेच विविध योजनासाठी तरतूद 
  • जून 2019 - 600 कोटी 
  • ऑगस्ट 2019 - 1136.39 कोटी 

त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नव्हता. या प्रस्तावाला सोमवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. ही मदत देताना शिवसेनेने बेस्ट उपक्रमाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : ही बातमी वाचून तुम्ही म्हणू शकता, अरे दूध कुठे पितो.. चल बिअर प्यायला जाऊ

बेस्टच्या अर्थसंकल्पात 2200 कोटी रुपयांची तूट असल्याने कामकाजात अद्याप सुधारणा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे कारभार तत्काळ सुधारावा; अन्यथा मदतीबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला. 

WebTitle : government approves four hundred crore for BEST


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government approves four hundred crore for BEST