तीन पक्षांशिवाय स्थिर सरकार येणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

मलिक म्हणाले, 'आज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गट नेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी कमिटी स्थापन करण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, राज्यात स्थिर सरकार हवं असेल तर, तीन पक्ष सत्तेत एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. 

मी ठणठणीत त्याच आवेशाने परत येणार : संजय राऊत

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे 'हे' असतील पर्याय

मलिक म्हणाले, 'आज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गट नेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी कमिटी स्थापन करण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहे. अहमद पटेल, वेणुगोपाल मुंबईत येत आहेत. काँग्रेस सोबत चर्चा करूनच निर्णय घेऊ. आमच्याकडे बहुमत नाही हे स्पष्ट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एक एकत्र आल्याशिवाय सरकार होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेसशी चर्चा करूनच जो काय असेल तो निर्णय घेऊ.'  शरद पवार यांची काँग्रेसच्या तीन वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि केसी वेणुगोपाल यांच्याशी शरद पवार यांची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे हे तिन्ही नेते मु्ंबईला येत आहे. त्यांच्यासोबत शरद पवार यांची सायंकाळी पाच वाजता वाय. बी. चव्हाण येथे बैठक होऊन सविस्तर चर्चा होईल. त्यानंतरच आम्ही जो काही असेल तो निर्णय घेऊ, असे मलिक यांनी स्पष्ट केले. 

पाऊस मुख्यमंत्री पाहून नाही, तर मुख्यमंत्री घेऊन गेला

'राष्ट्रपती राजवटची माहिती चुकीची'
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची बातमी सगळीकडे दिसत आहे. त्यावर मलिक म्हणाले, 'राष्ट्रपती राजवट लागू केल्याची बातमी सगळीकडे दिसत असली तरी.  राजभवनातून या बाबत खुलासा झाला असून, अशी कोणतिही शिफारस केली नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.'

राष्ट्रवादीचे कसब पणाला; राज्यात आज काय घडू शकते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government cant be formed unless Congress Shivsena and NCP comes together in Maharashtra