esakal | राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल : बाळासाहेब थोरात
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल : बाळासाहेब थोरात

- राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल

- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील.

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल : बाळासाहेब थोरात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही. म्हणून ते बोलत आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना लगावला. तसेच राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

क्रिकेट आणि राजकारण या दोन्हीमध्ये फरक आहे. क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो, पण भाजपला बॉल दिसला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना खूप उशीरा भेटले. आम्ही आधीच राज्यपालांना भेटलो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना मदत करावी म्हणून आधी विनंती केली.

'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हणणार नाही, पण... : संजय राऊत

तसेच ते पुढे म्हणाले, राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल. तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील.