कामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. भारतीय कामगार सेना, आयटक, इंटक, सीटू, हिंद मजदूर सभा, एनटीयूआय, तसेच बॅंक, विमा, शिक्षक-प्राध्यापक, वीज कामगार, म्युनिसिपल कामगार, बेस्ट, एसटी तसेच खासगी उद्योगांतील कामगार-कर्मचारी संघटना यात सहभागी होणार आहेत, असे कामगार संघटना कृती समितीचे सहनिमंत्रक विश्‍वास उटगी, भारतीय कामगार सेनेचे सूर्यकांत महाडिक, मुंबई इंटकचे अनिल गणाचार्य यांनी सांगितले. 50 हजारांवर कामगार मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: government oppose rally at labour day