ख्रिश्चन समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने ख्रिश्चन समाजासाठी नेहमीच आंदोलने करून गल्ली ते दिल्ली पर्यंत हक्कासाठी लढा दिला. मे महिन्यातही वेगवेगळ्या मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे बेमूदत आंदोलन करून समाजाच्या मागण्या ठामपणे सरकार पुढे मांडल्या व अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सकारात्मकता दाखविल्यामूळे आंदोलन मागे घेण्यात आले.

ख्रिश्चन समाजाच्या मागण्या संदर्भात दिलीप कांबळे यांनी नुकतीच सर्व विभाग प्रमुखांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत ख्रिस्ती समाजाला प्रत्येक जिल्ह्यात 20 गुंठे जागा दिली जाईल. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळा मार्फत ख्रिस्ती तरूणांना प्राधान्याने कर्ज दिले जाईल. चर्चवर हल्ले करणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल. वंचितांच्या माता पंडिता रमाबाई यांच्या नावाची शिफारस भारतरत्न पूरस्कारासाठी करण्यात येईल. स्वातंत्र्यपूर्व काळातील ख्रिश्चन जमिनी संदर्भात खरेदी विक्री वर बंधन आणण्यासाठी काय करता याचा अभ्यास सरकार करणार आहे. तसेच अल्पसंख्यांक आयोग व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळावर ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल. यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर देखील चर्चा करण्यात आली तेव्हा शिष्टमंडळाने नाव सूचवावे त्या नावाची शिफारस आपण मुख्यमंत्र्यांकडे करू असे कांबळे साहेबांनी सांगितले. समाजाच्या वतीने ख्रिस्ती समाजाचे धडाडीचे ख्रिस्ती नेतृत्व अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आशिष शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.

ख्रिस्ती समाजाचे नेते आशिष शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, "मला माहिती नाही.माझ्या नावाची चर्चा कशी काय सूरू आहे.परंतु मी प्रामाणिकपणे ख्रिस्ती समाजासाठी दहा वर्षापासून लढा देत आहे. ख्रिस्ती समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून करित आहे की ज्यामूळे ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व या महाराष्ट्रात तयार व्हावे.कधि संधी मिळालीच तर अल्पसंख्यांक बांधवांसाठी ऐतिहासिक कार्य करेल. परंतु अल्पसंख्खाक समाजाला न्याय देण्यासाठी ह्या जागे वर नियुक्त्या द्यायला हव्यात. तर समाजाला न्याय मिळेल."

Web Title: government positive on christian community s demand