सरकार दंगली घडवण्याच्या तयारीत - ऍड.प्रकाश आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई - देशातील वातावरण तापवण्याचे काम सरकार करत आहे. भिमा कोरेगाव दंगल त्याचे उदाहरण आहे. देशात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या होते. त्यावर चर्चा होत नाही. मात्र पॅंथरने, नक्षलवादी, डाव्या चळवळीने, मानवतावाद्यांनी ही गोळी घातली असती, तर दंगल घलडी असती. असे म्हणत चैत्यभूमीवरील सभेत भारीप बहूजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर तोफ डागली. 

मुंबई - देशातील वातावरण तापवण्याचे काम सरकार करत आहे. भिमा कोरेगाव दंगल त्याचे उदाहरण आहे. देशात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या होते. त्यावर चर्चा होत नाही. मात्र पॅंथरने, नक्षलवादी, डाव्या चळवळीने, मानवतावाद्यांनी ही गोळी घातली असती, तर दंगल घलडी असती. असे म्हणत चैत्यभूमीवरील सभेत भारीप बहूजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर तोफ डागली. 

ते पुढे म्हणाले, पोलीसाची हत्या करण्याच्या चौकशीत बजरंग दलाचे नाव पुढे आले. त्यावर कारवाई नाही. पोलीसांनी चौकशीनंतर नाव जाहीर केले नसते, तर सरकारने मुस्लिमांनी गोळी झाडली असे सांगत दंगल घडवली असती, तिच दंगल देशभरात पसरवली असती. त्यामूळे देशातील निवडणूका जाहिर होईपर्यंत, सरकारचे दंगली घडवणारी माणस तयार असल्याचे ही त्यांनी सांगितले. राज्यात भिमा कोरेगावच्या निमित्ताने ही तणाव निर्माण केला गेला. तर अयोध्याच्या निमित्तानेही तेच झाले. त्यामूळे सत्तेवर येण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे दंगल हे सर्वात मोठे हत्यार आहे. या देशात हत्यार बाळगायचे असेल तर कायद्याने परवानगी आवश्‍यक आहे. मग युद्धात चालणारी हत्यारे संघाकडे आली कुठून असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. सरकारच्या तिजोरीतील पैसे संपले म्हणून रिजर्व बॅंकेवर डल्ला मागायला निघाले होते. शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. जलसंपदा घोटाळ्यातील नेत्याचे नाव कोर्टात उघड झाले मात्र कारवाई काहीच झाली नाही. असे म्हणत यावेळी अजित पवार यांच्यावर टिका केली. संविधान विरोधी एक शक्ती आहे तर संविधान समर्थानात एक शक्ती आहे असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामूळे मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम सरकारने केलं आहे. त्यासाठी 2019 ला हे सरकार पडायचं याची खून गाठ बांधावी असे ही सभेला उपस्थित अनुयायांना प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले. 

सगळे एकत्र आले तर मंत्रीपद सोडतो - रामदास आठवले 
संघटन वेगळे असू शकतात, मात्र डॉ.बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे सगळे संघटन कधीही एकत्र येऊ शकते. त्यामूळे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल, आम्ही वेगवेगळे आहे, पण एक दिवस एकत्र येवूच. गट करायचे नसतील, सगळ्यांनी एकत्र येत असेल तर मी मंत्री पद सोडू शकतो, भाजपा सोबत असलो तरी, माझ्या हाती झेंडा निळा आहे. 

Web Title: Government ready to the riots says prakash Ambedkar