'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन वनांसाठी आरक्षित होणार

'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन वनांसाठी आरक्षित होणार

मुंबई :मुंबईतील 'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन जंगल म्हणून आरक्षित केली जाणार आहे. याआधी सरकारने 600 एकर जमिन वनासाठी आरक्षित केली. त्यामुळे एकूण 800 एकर जमिनीवर जंगल उभे राहणार आहे. पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 सप्टेंबरला आरे मधील 600 एकर जमिन जंगल म्हणून घोषित केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा 11 सप्टेंबर रोजी वन विभागा तसेच पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव,आरे विभागातील मुख्य अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाचे मुख्य अधिका-यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आरे परिसराची पाहणी केली.

आरे परिसर कशा प्रकारे संरक्षित केला जाऊ शकतो शिवाय तेथील वने सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी घेतली. आरे मधील 800 एकर जमिन आता वनांसाठी संरक्षित करण्यात येणाल असल्याचे वन विभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले. 

भारतीय वन कायदा 1972 नुसार एखादी जमिन जंगल म्हणून घोषित केल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा विकास करता येत नाही. कलम 4 नुसार सरकारना एखादी जमिन जंगल म्हणून घोषित कऱण्याचा अधिकार आहे. यानंतर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातात. त्यांचा विचार करून त्यानंतर सरकार परिपत्रक काढते व त्याची नोंद गॅझेटमध्ये केली जाते.

सरकारने संरक्षित म्हणून घोषित केलेल्या जमिनीमधून विवादीत मेट्रो कारशेडसाठी लागणारी जागा वगळण्यात आली आहे. ही जागा मेट्रो 1 अंतर्गत 33.5 किमी लांबीच्या भुमिगत मेट्रोसाठी कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली होती.    

सरकारने जंगल म्हणून घोषित केलेल्या जागेतच स्थानिक आदिवासींचे पुनर्वसन देखील करण्यात येणार आहे. शिवाय या परिसरात इको टुरिजम तसेच नाईत सफारी सुरू करण्याचे नियोजन देखील आहे. 

government took decision to reserve 200 acers more land as forest in aarey

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com