‘सरकारने बदलीचे धोरण महिलाभिमुख ठेवावे’

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - महिलांवरील कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता त्यांच्या रहिवासाच्या १०० किलोमीटर परिघात बदली करण्याचे धोरण तयार व्हावे, अशी मागणी अधिकारी-कर्मचारी महासंघाने केली आहे. चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्या हा शासकीय कर्मचाऱ्यांत रोषाचा विषय ठरला असतानाच ही मागणी पुढे आली आहे.

महाराष्ट्रातील १९ लाख शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण २२ टक्‍के आहे. पदोन्नती होताना बदली हे शासनधोरण आहे. राज्यात १ लाख २५ हजार कर्मचारी असून, त्यातील महिलांचे प्रमाण १५ टक्‍के एवढे आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे मान्य असले, तरी लहान मुले आणि दहावी-बारावीत मुले असताना करिअरच्या वळणावर महिलांना काहीसे उदारपणे वागवा, अशी यामागची भावना आहे. त्यामुळे बदलीचे धोरण महिलांसाठी वेगळे असावे, अशी निवेदनवजा मागणी राजपत्रित अधिकारी-कर्मचारी महासंघाने केली आहे. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना यासंबंधी निवेदन पाठविले आहे.

Web Title: government transfer women