सरकारने पुरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली! सुधीर मुनगंटीवार यांची टीका; विदर्भाला केवळ 16 कोटी

विनोद राऊत
Thursday, 10 September 2020

 पुर्व विदर्भातील पुरग्रस्तांना केवळ 16 कोटी 48 लाख रूपयांची मदत जाहिर करुन सरकारने पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

मुंबई :  पुर्व विदर्भातील पुरग्रस्तांना केवळ 16 कोटी 48 लाख रूपयांची मदत जाहिर करुन सरकारने पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेल्यावर्षी 29 ऑगस्टरोजी जीआर काढला होता. या निर्णयातील तरतूदी विदर्भातील पूरग्रस्तांसाठी तातडीने लागू कराव्यात या मागणीचा पुनरूच्चार त्यांनी केला. 

मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांचा सरकारवर हल्ला; नात्यातले दोन वकील नेमल्याचा आरोप

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे, शेतक-यांचे आर्थिक नूकसान झाले आहे. गोसीखुर्दचे दरवाजे उघडण्या्पूर्वी कोणतीही पूर्व सुचना न दिल्यामुळे हे मानवनिर्मीत पुराचे संकट ओढावले आहे. राज्य शासनाने मात्र 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे. अद्याप 10 हजार रूपयांची मदत सुध्दा पुरग्रस्तांच्या हाती आली नाही. प्रशासनाने पुरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन केले नाही, चारा छावण्या उभारल्या नाही.  पुरग्रस्तांवर उपकार केल्याच्या थाटात पंचनामे केले जात आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.  शेतक-यांची जनावरे पुरात वाहून गेली त्यांना मदत देण्यासाठी निधीचा उल्लेख नाही. शेतजमीन पूर्ववत पेरणी योग्य‍ करण्याबाबतही मदतीमध्ये कोणताच उल्लेख नसल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाचे वेळापत्रक जाहीर; 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप

... तर भाजप रस्त्यावर उतरेल!
विदर्भात 70 टक्क्यांहून अधिक धान, सोयाबिन पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत सरकारने काहीही उपाययोजना केल्या नाहित. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल मंजूर करण्याची आवश्यकता आहे. शासनाने तातडीने भरीव मदत जाहीर न केल्यास भाजप आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government wipes leaves from flood victims mouths! Criticism of Sudhir Mungantiwar; Only 16 crores to Vidarbha