सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्य खात्यालाही फटका 

नेत्वा धुरी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

राज्यभरातील रुग्णालयातील कोणत्याच शस्त्रक्रिया व बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर अजिबातच परिणाम झाला नसल्याचा दावा आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ संजीव कांबळे यांनी दिली. संपूर्ण राज्यातील एक हजार आठशे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे व चारशे साठ ग्रामीण व शहरी रुग्णालयांत शिकाऊ परिचारिका तसेच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने दैनंदिन कारभार सुरळीत पार पडल्याचा दावाही त्यांनी केला. 

मुंबई : सरकारी कर्मचा-यांच्या तीन दिवसांच्या संपाचे पडसाद पहिल्याच दिवशी आरोग्य सेवेवरही दिसून आले. आरोग्य विभागातील राज्यभरातील कर्मचारी आणि परिचारिका असे वीस टक्के तर आणि चतुर्थ श्रेणीतील 24 टक्के कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती आरोग्य संचलनालयाकडून दिली गेली. 

राज्यभरातील रुग्णालयातील कोणत्याच शस्त्रक्रिया व बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर अजिबातच परिणाम झाला नसल्याचा दावा आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ संजीव कांबळे यांनी दिली. संपूर्ण राज्यातील एक हजार आठशे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे व चारशे साठ ग्रामीण व शहरी रुग्णालयांत शिकाऊ परिचारिका तसेच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने दैनंदिन कारभार सुरळीत पार पडल्याचा दावाही त्यांनी केला. 
सरकारी रुग्णालय चांगलाच शुकशुकाट जाणवला. जेजेत अॅडमिट रुग्णांना जेवण पुरवण्याच्या कामासाठी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या गेल्या, उर्वरित नियोजित शस्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती जेजे रुग्णालय समूहाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ मुकुंद तायडे यांनी दिली. रुग्णालयीन कामकाज सांभाळायला 240 नर्सिंगचे विद्यार्थी, 250 एमबीबीएसचे विद्यार्थी, 45 सफाई कामगार आणि 82 सुरक्षारक्षकांची मदत घेतल्याचेही डॉ तायडे म्हणाले. 

कामा रुग्णालयातही दोन प्रसूती आज पार पडल्या. एक आपत्कालीन शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉ राजश्री काटके यांनी दिली. जीटी रुग्णालयात केवळ एकच आपत्कालीन शस्त्रक्रिया पार पडली. बाकीच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या. साफसफाईसाठी कंत्राटी स्वरुपात काही कर्मचा-यांना जीटी रुग्णालयात नियुक्त करण्यात आले. सेंट जोर्जमध्येही केवळ एकच आपत्कालीन शस्रक्रिया पार पडली.

Web Title: government workers strike effect on health department