भगतसिंग कोश्यारी यांचा आला पहिला नंबर, पटकावलं २५ हजारांचं बक्षीस...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त “ढाई आखर” ही राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती.

मुंबई : डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त “ढाई आखर” ही राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये  “प्रिय बापू आप अमर है” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. लिफाफा आणि आंतरदेशीय पत्र अशा दोन भागात ही स्पर्धा होती. या स्पर्धेत तब्बल ८० हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

स्वतः डाकसेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र या गटात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रथम पारितोषिक मिळाल्यानंतर मुंबई डाक विभागाचे वरिष्ट अधिकारी पी सी जगताप आणि सहाय्य्क अधिक्षक एस डी खरात यांनी मुंबईत राज्यपाल भवनात जाऊन भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि राज्यपालांना प्रथम पुरस्काराचा २५ हजार रकमेचा धनादेश सुपूर्द केला. 

स्वतः राज्यपालांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिलीये 

INSIDE STOY : शोध, चाचणी, विलगीकरण, धारावी पॅटर्नची त्रिसूत्री...

BIG NEWS - महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुरु होणार शाळा, पण 'ही' आहे अट...

मागील वर्षी म्हणजेच जून २०१९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते भारतीय डाक व‍िभागाने आयोजित केलेल्या मुंबईपेक्स या दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचं उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळीसच राज्यपालांनी डाक विभागाच्या पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्याबद्दल अभिमानदं केलं होतं. या स्पर्धेत मी स्वतः सहभाग घेईन असं देखील राज्यपालांनी त्यावेळीसच जाहीर केलेलं. त्यानुसार राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा गांधींवर आधातील निबंध लिहून पाठवला होता. 

Governor Bhagat Singh Koshyari won the first prize in the State Level Letter Writing Competition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari won the first prize in the State Level Letter Writing Competition