राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

पूजा विचारे
Tuesday, 13 October 2020

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपालांनी मंदिर कुलूपबंद का?, असा सवाल उपस्थित केला आहे. 

मुंबईः  राज्यातील बंद मंदिराबाबत  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपालांनी मंदिर कुलूपबंद का?, असा सवाल उपस्थित केला आहे.  या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली.

बार-रेस्टारंट सुरु झाले, देवच कुलूपबंद का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसंच हिंदुत्वाचा विसर पडला का?, असंही राज्यपालांनी त्यांना विचारलं आहे. मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?, असं विचारत राज्यपालंनी या पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

 या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले. बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?  असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विचारलेत. 

अधिक वाचाः  कोरोना नियंत्रणातच, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं सुरु करण्याबद्दल सूचना केली आहे. ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली, अशी आठवण देखील मुख्यमंत्र्यांना करुन द्यायला राज्यपाल विसरले नाहीत.

अधिक वाचाः  मास्क न वापरणाऱ्या विरोधात विशेष मोहिम, रोज 20 हजार नागरिकांवर कारवाई

तुम्ही 11 ऑक्टोबर कोरोना संदर्भात संबोधित करताना मंदिर तुर्तास खुले करणे कठीण सांगितले आहे. काही शिष्टमंडळं मंदिर खुले करावे यासाठी भेटले. त्यामुळे हा पत्रव्यवहार करत असल्याचेही राज्यपाल यांनी सांगितले.

Governor Bhagat Singh Koshyari Wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari Wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray