राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीमध्ये खलबतं ?

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीमध्ये खलबतं ?

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीच्या हालचाली पाहायला मिळतायत. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या जागा भरणे बाकी आहे.अशात गेल्या आठवड्यापासून खरंतर याबाबतची चर्चा सुरु झालेली. त्यानंतर आज याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. उद्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता उद्याच्या बैठकीत याबाबतचा विषय चर्चेस येणार का याबाबत सर्वांचं लक्ष आहे.   

खरंतर आज सकाळी राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आज पार पडलेल्या बैठकीत राज्यपालांच्या पत्राबाबत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराबाबत चर्चा करण्यात आली आणि पुढील रणनिणती काय असावी याबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीबाबत पुढे कशी पावलं उचलली जातायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

governor elected mla important meeting conducted at varsha

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com