कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त पदासाठी गोविंद बोडके यांची नियुक्ती

सुचिता करमरकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते आयुक्त पी वेलारसू यांची रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (19 मार्च) आपण आपल्या पदभार स्विकारणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त बोडके यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. 

पालिकेस समोर असलेली आर्थिक चणचण लक्षात घेऊन नविन आयुक्तांना कारभार करावा लागणार आहे. हे 2017 मधे पी वेलारसू यांनी आयुक्त म्हणून कडोमपाचा कार्यभार स्वीकारला होता. मागील दहा महिन्यांत त्यांनी पालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी कठोर निर्णय घेतले. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रसंगी लोकप्रतिनिधींची नाराजी स्विकारुन त्यांनी अनेक कामे थांबवली. नव्याने येणाऱ्या आयुक्तांना आर्थिक स्थिती सुधारण्याचे महत्त्वाचे काम करावयाचे आहे. 

Web Title: Govind Bodke to be appointed as Kalyan Dombivli Municipal Commissioner