कोर्टाच्या शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी

Devendra fadnavis
Devendra fadnavis

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या खटला प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्यावरून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या शेरेबाजीबाबत विधानसभेत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांतील काही खटल्यांतील सुनावणीदरम्यानच्या न्यायलयातील निकालांचे संदर्भही दिले. पानसरे खून खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत का? अशी तोंडी टिप्पणी केली होती.

त्यासंदर्भातील बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. लोकशाहीच्या तीनही स्तंभांनी आपल्या चौकटीत काम करावे आणि एकमेकांच्या अधिकारात अधिक्षेप करू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com