समन्सप्रकरणी गोविंदाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - अभिनेता गोविंदाला एका चित्रपटाशी संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज 25 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला.

मुंबई - अभिनेता गोविंदाला एका चित्रपटाशी संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज 25 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला.

झारखंडमधील पंकुर दंडाधिकाऱ्यांसमोर सहा मार्चला हजर राहण्याचे समन्स गोविंदाला बजावण्यात आले होते. त्याबाबत त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. गोविंदाचा "छोटे सरकार' हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात "एक चुम्मा तू मुझको उधार दे दे बदले में यूपी बिहार ले ले' अशा आशयाचे गाणे होते. या गाण्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारची बदनामी झाल्याचे तसेच आपल्या भावना दुखावल्याचा दावा 1997 मध्ये एका वकिलाने केला होता. या प्रकरणी पंकुर दंडाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवल्यानंतर गोविंदाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

Web Title: govinda bell sanction