नितीन राऊतांचा खणखणीत टोला; "गडकरींनी निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सांभाळलं म्हणून आम्ही जिंकलो"

नितीन राऊतांचा खणखणीत टोला; "गडकरींनी निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सांभाळलं म्हणून आम्ही जिंकलो"

मुंबई : विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीत प्रचंड आनंद आहे. त्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येतायत. पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांवर स्वतः शरद पवारांनी देखील आनंद व्यक्त केलाय. "महाराष्ट्राचं चित्र बदलतंय", असं वक्तव्य सूचक विधान शरद पवारांनी केलं. या निकालांनंतर ज्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या प्रतिक्रियेतून नितीन गडकरी यांना चिमटा काढलाय. 

नागपूरमधील विजयाचे विश्लेषण करताना नितीन राऊत यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे."मी नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि आभार मानले पाहिजेत. त्यांनी या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये विजयाची संधी प्राप्त करून दिली. नितीन गडकरी यांनी त्या मतदार संघाचे चार ते पाच वेळेस नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा तो मतदार संघ आहे. त्यामध्ये कधीही काँग्रेस किंवा इतर पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. म्हणूनच त्यांचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली." 

Graduate constituency election 2020 nitin raut pokes nitin gadakari over results of Nagpur    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com