महापोली येथील भुरे महाविद्यालयात पार पडला पदवीदान समारंभ

bhure-college
bhure-college

वज्रेश्वरी (भिवंडी) - महापोली येथील हाजरा मोहम्मद हुसेन भुरे महाविद्यालयाच्या प्रथम पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. यावेळी महापोली येथील अल्पसंख्याक समाजातुन उच्च पदस्थ अधिकारी निर्माण व्हावेत अशा आशा व्यक्त करताना, असा दिवस गावासाठी सुदिन असेल, असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इरफान भुरे यांनी सांगितले. पदवीदान समारंभाच्या वेळी ते बोलत होते. 

अल्पसंख्याक समाजात मुलींना शिकविण्याबाबत अजून व्यापक दृष्टिकोन बाळगला जात नाही. परंतु मला गर्व आहे की महापोली गावातील सुरु झालेल्या महाविद्यालयात सर्व मुली शिक्षण घेत असून, त्यांना पदवी प्रदान करण्याचे भाग्य मला लाभले. याचा आनंद होत असल्याच्या भावना भुरे यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून झैद पटेल, उबेद हलबे, पंचायत समिती सदस्या साबिया इरफान भुरे, फरहान पटेल, दादा पटेल नईम भुरे, इब्राहिम पटेल, डॉ. सबिना भुरे इत्यादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . 

महापोली येथील महापोली एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून २०१४ पासून महाविद्यालय सुरु करण्यात आले. या वर्षी बावीस विद्यार्थीनी पदवी परीक्षेस बसल्या होत्या त्यापैकी पंधरा विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 

त्यामध्ये अनुक्रमे हाजरा मोहतसीम भुरे, रुक्सना अहमद सय्यद, साबा शेहबाज भरमाल यांनी प्रथम, द्वितिय आणि तृत्तीय क्रमांक पटकाविला. तसेच संस्थेची माजी विद्यार्थिनी नाझिया हसन पटेल हिने मुंबई विद्यापीठातून पाणीशास्त्रा विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली असून, तिचाही गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या अलमास तौसिफ़ शेख यांनी मान्यवरांचे स्वागत सन्मान केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौशाद पटेल सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या अलमास तौसिफ़ शेख, उपप्राचार्य असलम खान यांसह प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com