Grampanchayat Election | पालघरमध्ये ग्रामपंचायतींच्या निकालाची उत्सुकता शिगेला; 10 वाजता मतमोजणीलाला सुरूवात

संदीप पंडित
Sunday, 17 January 2021

पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज या निवडणुकांची मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहेत.

विरार  ः पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज या निवडणुकांची मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहेत. आज सकाळी 10 वाजता वसई तालुक्‍यातील पाली आणि सत्पाळा ग्रामपंचायतींची मतमोजणी तहसीलदार कार्यालय येथे होणार असून, सागावे ग्रामपंचायतीची मतमोजणी पालघर तहसीलदार कार्यालय येथे होणार आहे. 

पालघर जिल्ह्यातील पाली, सतपाळे आणि सागावे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. यामध्ये वसई तालुक्‍यातील पाली ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच 7 पैकी 3 जागा बहुजन विकास आघाडीने बिनविरोध जिंकल्या आहेत; तर 4 जागांसाठी निवडणूक पार पडली. या ठिकाणी 83 टक्के मतदान झाले आहे. सत्पाळा ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 27 उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी 79 टक्के इतके मतदान झाले आहे.

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

या ठिकाणी बहुजन विकास आघाडीविरोधात महाविकास आघाडी आणि ग्राम समृद्धी पॅनल अशी लढत रंगली आहे; तर पालघर तालुक्‍यातील सागावे ग्रामपंचायतीत निवडणुकीपूर्वी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या असून 4 जागांसाठी 8 उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी 89 टक्के मतदान झाले आहे.

Grampanchayat Election Curiosity about the outcome of the Gram Panchayat in Palghar Counting begins at 10 p.m

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchayat Election Curiosity about the outcome of the Gram Panchayat in Palghar Counting begins at 10 p.m